पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील रेशनिंग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. ई” परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ, ह”म” परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख, फ” परिमंडळ अधिकारी नागनाथ भोसले, ग” परिमंडळ अधिकारी लक्षमण माने यांची खात्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे.
३ वर्षे पूर्ण झाल्याने शासनाच्या आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. ई” परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ यांची बदली अ” परिमंडळ अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
ह”म” परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांची बदली फ” परिमंडळ अधिकारी, नागनाथ भोसले यांची पदोन्नती बदली झाली आहे. तर ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांची बदली बारामती येथे झाली आहे. सदरील बदलीचे आदेश गजानन रा. देशमुख अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी काढले आहेत.