पुणे सिटी टाईम्सच्या कार्यालयात भेट घेऊन दिली माहिती.
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड व पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. त्याबाबत आज नामांकनाची छाननी करण्यात आली, तसेच कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर उमेदवार आहेत तर भाजप कडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक एक चर्चेचा विषय बनला आहे. अशातच काँग्रेसचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते खिसाल जलाल जाफरी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खिसाल जाफरी बहुजन आणि अल्पसंख्यांकांचे शिक्षण (scholarship), रोजगार आणि आरोग्य विषयक मुद्द्यांवर काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींना बोलताना सांगितले.
खिसाल जाफरी यांची ओळख शैक्षणिक कार्यकर्ते उर्फ ऑक्सिजन मॅन अशी असून त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस बरोबर काढले आहेत त्यामुळे आता ही निवडणूक पाहण्याजोगी झाली आहे. तर गुरूवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, मोमीनपुरा, गंजपेठ, रविवार पेठ, कसबा पेठ व इतर भागात चांगलाच दांडगा संपर्क असल्याने ते मते नक्कीच खेचू शकतात असे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांचे मत आहे.