कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले.
पुणे सिटी टाईम्स ; प्रतिनिधी. डिश टिव्ही दुरूस्तीचे नावाखाली घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ९ सप्टेंबर २०२१ रोजी ज्ञानेश्वर धोंडीबा मरगळे, वय ३८ वर्षे, रा. गल्ली नं ३ पानसरे नगर कोंढवा बुद्रुक हे त्यांचे लहान मुलांना घरामध्ये ठेवून पत्नीसह कामास निघून गेले.
असता एका अनोळखी इसमाने त्यांचे घरात प्रवेश करून मुलास तुझ्यावडीलांनी डिशचा रिचार्ज करायला सांगितले आहे. तुमच्या डिशची वायर लुज झाली आहे.
असे सागून मुलास गोठ्यामध्ये वायर धरून उभे करून घरातील लोखंडी कपाटील सोन्याचे मंगळसुत्र व सोन्याची पोत असा मुद्देमाल चोरून नेला असल्याने त्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर सरदार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
जानकर पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गोकुळ राऊत पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शानाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला.
तपास पथकातील पोलीस नाईक जोतिबा पवार व सतिश चव्हाण यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घरफोडी चोरी करणारा इसम हा येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथे थांबला आहे.
अशी माहिती मिळाल्याने आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांचेसह पोलीस हवालदार रमेश गरूड पोलीस नाईक जोतिबा पवार, सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, तुषार अल्हाट, पोलीस अंमलदार किशोर वळे व लक्ष्मण होळकर असे रवानाहोवून येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथे सापळा लावून आरोपी मनिष मुर्ती पुजारी, वय २८ वर्षे, रा. रामनगर स.नं. १०८/१०९, रामटेकडी हडपसर यास ताब्यात घेतले.
कोंढवा तपास पथकाने सदर आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे एकुण ६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीकडून एक दुचाकी गाडीसह सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळून एकुण ३ लाख ३० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे