पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरात काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला
आहे.कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांकडून कारवाई केली जाते मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पुण्यातील पुना कॉलेज समोरील हॉटेल निशा रेस्टॉरंट हॉटेलची गुंडांनी तोडफोड केली.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा }} https://m.facebook.com/100077510686957/posts/pfbid02QaHA3ChZUXhDA5NDWkiq1M2WyFXMU3gGyxBpkDKVPkRZawynQfKcas2zrwGfnV5Sl/?mibextid=Nif5oz
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.याप्रकरणी मोनिष शशिकांत म्हेत्रे वय-३९ रा.भवानी पेठ, यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सहा जणांवर आयपीसी ३५२,५०४, ४२७,१४३,१४७, आर्म अॅक्ट, मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.