सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई मात्र शुन्यच?
ससून,ताडीवाला रोड व इतर ठिकाणी चालू आहे मटका जुगार?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे रेल्वे स्टेशनजवळ भररस्त्यात चालणा-या मटका जुगाराची चर्चा सर्वत्र ठिकाणी होत असतानाही पोलिसांकडून कारवाई मात्र शुन्यच? पुणे स्टेशन एसटी स्टँड गजबजलेल्या ठिकाणी अवैधपणे मटका जुगार सुरू असल्या ची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.
ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मटका जुगार चालवणारा व त्यांना अभय देणारे “वसूली बहाद्दर” यांनी नामी शक्कल लढवून आठवडा भर ठिकाण बदलले होते,
परंतु आता बिनधास्तपणे मटका जुगाराचा खेळ सुरू झाला आहे. बंडगार्डनच्या हद्दीत ससून,ताडीवाला रोड, व इतर ठिकाणी पत्ते,मटका जुगार व रात्रीचे उशिरापर्यंत पब सुरू असल्याची चर्चा सुरू असून सुधीर नावाच्या “वसुलीवाल्यांचा” आशिर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
परंतु वरिष्ठांकडून कारवाई होत नसल्याने वरिष्ठांचा देखील याला पाठिंबा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.