पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
२२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखे कडील पथक चर्तुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, ब्रेमन चौकाकडुन स्पायसर कॉलेजकडे जाणारे रोडवर कचरा हस्तांतर केंद्र औध पुणे. चे समोरील सार्वजनिक रोड या ठिकाणी नायजेरीयन इसम थांबल्याचा दिसून आला.
त्याला त्याचे नाव विचारले असता चुकवुमेका केनेडी अन्यकोरा (Chukwuemeka Kennedy Anyakora ) वय ४४ वर्षे, रा. खडकी रेल्वे स्टेशन जवळ पुणे खडकी मुळ रा. लगोस, नायजेरिया असे सांगितले. त्याचे ताब्यात १२ लाख ३८ हजार १०० रूपये किंमतीचे ८२ ग्रॅम ५४० मिलीग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ, रोख रक्कम असे १२,लाख ३९ हजार ६०० रूपये मिळून आले.
त्याचे विरुध्द चर्तुःशृंगी पोलीस अंमलदार मारुती पारधी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शैलजा जानकर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी,श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे गजानन टोम्पे,यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर,
पोलीस अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, संदिप जाधव, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, रेहना
शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.