पुणे शहरा मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद;३ लाख ६३ हजारांचा माल जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरा मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद करून ३ लाख ६३ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,दोन इसम लुल्लानगर येथील कलश प्युअर व्हेज हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी संशईतरीत्या मिळुन आल्याने पोलीस
अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर संशईत इसमांना ताब्यात घेतले असता,

१) मतीन हुसेन मेमन,वय-२१ वर्षे,रा. सातवा मजला,आदिया हाईट्स,सबेरा पार्क,स.नं. ४२ कोंढवा २) शाहरुख कादीर खान,वय २९ वर्षे,रा.फ्लॅट नं. ३०२, सी-विंग,युनिटी पार्क,कोंढवा, यांचेपैकी १) मतीन हुसेन मेमन याचे ताब्यातून १ लाख,५२ हजार १०० रूपयांचा १० ग्रॅम १४० मिलीग्रॅम एम.डी.हा अंमली पदार्थ,तसेच शाहरुख कादीर खान याचे ताब्यातून १ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा १० ग्रॅम १२० मिलीग्रॅम एम.डी.अंमली पदार्थ व एक मोबाईल फोन एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण ३ लाख ६३ हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.

तसेच एम.डी. अंमली पदार्थ त्यांनी अनमोलसिंग मनचंदा सिंग, वय-३३ वर्षे, रा.विंग,ए-४०६,साई व्दाराकायम सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे याचेकडुन विक्रीकरीता आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन, यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात ४३१/२०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२(ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक,शैलजा जानकर, सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके,योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here