लाच देण्यापेक्षा लाच घेण्याचेच प्रकार जास्त : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली माहिती.

0
Spread the love

२०१२ मध्ये लाच देणा-याला झाली शिक्षा. ( Pune anti corruption bureau news)

११ वर्षात फक्त १० केसेस दाखल, माहिती अधिकारात माहिती आली समोर.

…………. “ग्राऊंड रिपोर्ट”……….

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी. लाच देण्यापेक्षा घेण्याचेच प्रकार जास्त असल्याचे माहिती अधिकारात आलेल्या माहितून समोर आले आहे. आज शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राजरोसपणे लाच मागितली जात असल्याचे आपणास ऐकण्यास व पाहण्यास मिळत आहे.

शासकीय कार्यालयात ( government office) कामे न करता ती प्रलंबित ठेवून लवकर कामे करून देण्यासाठी थेट लाच मागितली जाते, परंतु सन २०११ ते २०२१ पर्यंत १० जणांनी स्वता शासकीय लोकांना लाच देण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणजे साधारणता वर्षाला एक” किंवा २ गुन्हे दाखल होत असतात? म्हणजे शेकडो लाच घेणाऱ्या भ्रष्टाचा-यांमागे ( corruption) एक-दोन लाच देणारे आहेत.काहि महिन्यांपूर्वी पुणे शहर तहसिलदारांना लाच दिल्याप्रकरणी एका वाळू व्यावसायिकावर खडक पोलीस ठाण्यात ( khadak police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लाच दिल्याची घटना घडल्यावर पुणे शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे सिटी टाईम्सने ( pune City times) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वता नागरिकांनी शासकीय लोकांना लाच दिल्याची नोंदणीची माहिती ( right to information) मागितली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीतून सन २०१२ मध्ये एका नागरिकाला शिक्षा झाली आहे तर २०१६ मध्ये १ गुन्हा दाखल तर सन २०१७ मध्ये २, व २०१८ मध्ये २, आणि २०२० मध्ये १ असे गुन्हे दाखल असून सध्या ते न्यायप्रविष्ट आहेत.

तसेच २०२१ मध्ये खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास चालू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाने कळविले आहे. यातून असे दिसून येते की क्वचितच नागरिक स्वताहून लाच देतात तर नागरिकांकडूनच शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जाते हे आता स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here