खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते १५०दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते १५०दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग, संत तुकाराम व्यापार संकुल निगडी येथे आयोजित करणेत आला होता.

सदरचे कार्यक्रमास १५० दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान दिव्यांग यांचे शिधापत्रिके मध्ये नाव कमी करणे व वाढविणे इत्यादी बाबत अर्जाचे वितरण करणेत आले, तसेच
शिधापत्रिकेचे सुध्दा वितरण करुन लाभ देणेत आला आहे.

आय.एस.ओ. ९००१- २०१५ चे कामकाजाबाबत परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांना राजेश देशमुख जिल्हाधिकारी, डॉ. त्रिगुण कुलकणी उपआयुक्त (पुरवठा) व सचिन ढोले अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

बारणे आय.एस.ओ. चे मानांकनाचे कार्यालयाची पाहणी करुन नागरीकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुलभ शैचालय, तक्रारपेटी, प्रथमोपचार, दिव्यांग व वयोवृध्द नागरीकां करीता विशेष बैठक व्यवस्था, शिधापत्रिका अर्जदार यांना त्यांचे अर्ज भरणे करीता विशेष व्यवस्था करणेत आली आहे,

तसेच शिधापत्रिका संबंधित सर्व अद्यावत माहिती फलक लावणेत आले आहे, ऑनलाईन रेशनकार्ड तपासणी करीता विशेष एक खिडकी योजना चालु करणेत आली आहे. तसेच सर्व सामान्य नागरीकांकरीता तक्रार नोंदवही,अभिप्राय नोंदवही, कार्यालयीन भेट पुस्तिका ठेवणेत आले आहे.

तसेच नागरीकांकरीता बँके प्रमाणे टोकन पध्दतीने शिधापत्रिकेचे कामकाज करणेत येत आहे. तसेच त्यांनी कार्यालयातील स्वच्छता व अभिलेख अद्यावतीकरणा बाबत त्यांनी कार्यालय व कार्यालयाच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले आहे.

सदरचे कार्यक्रमास अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राजेंद्र वाघचोरे, उपाध्यक्ष- प्रहार संघटना पि.चि.दत्तात्रय भोसले अध्यक्ष प्रहार संघटना पि.चि. सुरेश वाडकर वृक्ष प्रधिकरण सदस्य, वैभवीताई घोडके, दक्षता समिती सदस्य,पि.चि.ज्ञानेश्वर शिंदे सचिव- शिवसेना पि.चि.योगेश बाबर- संघटक शिवसेना पुणे जिल्हा शंकरराव अतकरे- अध्यक्ष पि.चि.

रेशन व्यापारी असोसिएशनचे धर्मपाल तंतरपाळे- उपाध्यक्ष पि.चि. रेशन व्यापारी चिंतामणी सोंडकर- ऑल महाराष्ट्र फेयदर प्राइज शॉप किपर संघटना विजयजी गुप्ता,खजिनदार ऑल महाराष्ट्र फेयरपाईज शॉप किपर संघटना गणेश कांबळे व जय उणेचा, संजय धुतडमल, दिनेश तावरे परिमंडळ अधिकारी अ व ज विभाग, हेमंत भोकरे, सहा परिमंडळ अधिकारी,अनिता शिनगारे,स्नेहल गायकवाड, तुषार नावडकर, वैभव धिवार व निखील सोनवणे कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here