येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्टी विक्रेत्यावर एमपीडीए ची कारवाई

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार रमेश ईमजी चव्हाण, वय ४१ वर्षे, रा.स.नं. १४, जय जवाननगर, येरवडा, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातभट्टी दारु तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

मागील ५ वर्षामध्ये त्याचे विरूध्द ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.येरवडा पोलीस स्टेशन यांनी सादर केलेला प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी.डी.ए. कायद्यान्वये १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहे.

त्यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,येरवडा पोलीस स्टेशन, व सुरेखा वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पी. सी.बी.गुन्हे शाखा, यांनी कामगिरी पार पाडली. पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या तसेच अवैध हातभट्टी दारु निर्मीती व विक्री करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here