पुण्यातील नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयाने ठरविले रद्द !

0
Spread the love

अविनाश बागवे करणार सर्वोच्च न्यायालयात अपील.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे शहरातील प्रभाग क्रमांक १९ अ मधील क्रॉंगेस पक्षाचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचे मुंबई उच्च न्यायालयाने नगरसेवक पद रद्द ठरविले आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांना भोवले असल्याचे बोलले जात आहे. बागवे यांना सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी ६ आठवड्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत बागवे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती असल्याचा दावा त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. भुपेंद्र शेडगे यांनी केला होता.

मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची हरकत फेटाळली होती. त्या निर्णयाविरोधात शेडगे यांनी लघुवाद न्यायालयात दावा केला होता. त्यात बागवे यांनी बेकायदा बांधकामाची माहिती लपविली असल्याचे स्पष्ट करीत त्यासंबधीचे पुरावे सादर केले होते.

त्यावर न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले होते. त्याविरोधात बागवे यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही बागवे यांचे पद ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here