पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
मुस्लिम समाजाने आपआपले मतदार कार्ड तपासावे आणि शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन मुफ्ती शाहिद यांनी मुस्लिम समता परिषद मध्ये केले आहे. काल दि. २४ एप्रिल २०२४ रोजी पुण्यातील कॅम्प परिसरातील आशिर्वाद हॉलमध्ये सदरील परिषद पार पाडली गेली.
सदरील कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हजेरी लावली. सदरील कार्यक्रमात मुफ्ती शाहिद शेख, निजामुद्दीन मौलाना, एडवोकेट असिम सरोदे, विश्वंभर चौधरी, मोहन जोशी, अरविंद शिंदे, जावेद खान, एडवोकेट शाहीद शेख, नुरूददीन अली सोमजी, व इतर मान्यवर उपस्थित होते.
एडवोकेट असिम सरोदे म्हणाले संसदेच्या पायाऱ्यावर डोकं टिकवलं म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचे ठरवले आहे. आम्हाला १८ तास काम करणारा नको तर नैसर्गिक पणे रात्री झोपणारा माणूस पाहिजे, ज्या माणसाची झोप पूर्ण होत नाही तो माणूस चिडचिडा होते.
त्यामुळे आता मोदींना झोपायला पाठविण्याची वेळ आली आहे. मोदींची प्रतिमा आता भाजपालाच जड झाली आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मोंदीना आता पाडावे लागणार आहे.