राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षासहित इतरांवर गुन्हे दाखल, राज्यपाल कोश्यारी आंदोलन प्रकरण.

0
Spread the love

प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख,महेश हांडे, दीपाली धुमाळ,मृणाली वाणींसहित २५-३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी रोजी
महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते.

याप्रकरणी काल मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख,महेश हांडे, दीपाली धुमाळ,मृणाली वाणी, सुषमा सातपुते, किशोर कांबळे,

विक्रम जाधव, बाळासाहेब बोडके, योगेश ससाणे,सुनिल बनकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० महिला, पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारची पोलीस विभागाची व इतर विभागाची पूर्व परवानगी न घेता पुणे मनपा
कार्यालयात त्यांना आत जाण्यास रोखले असताना त्यांनी न ऐकता गैरकायद्याची मंडळी जमविली.


मनपाचे जुन्या इमारतीच्या पायऱ्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करुन आंदोलन केले होते. ज्ञानेश माने पोलीस शिपाई यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here