कोंढव्यातील गौणखनिज संदर्भात तहसिल हवेली कार्यालयाचे दुर्लक्ष?

0
Spread the love

११ महिन्यात फक्त ७ गौण खनिजाची परवानगी, धक्कादायक माहिती हाती.

राजरोसपणे सुरू आहे अवैध गौण खनिज.

शासनाचा महसूल बुडत असल्याने स्वतः पुणे जिल्हाधिकारी दखल घेणार का?

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी , पुणे शहरातील कोंढवा (kondwa) भागात बघता बघता अनधिकृत ( inlegal) पणे इमारती तर उभ्या राहत आहेत. परंतु इमारती उभ्या करताना गौण खनिज ( जमिन उत्खनन) royalty विभागाची परवानगी न घेता राजरोसपणे अवैध गौण खनिज उत्खनन चालू असतानाच हवेली तहसिल कार्यालयाचे व तलाठी,मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसत आहे.

विशेष म्हणजे भागात फिरून आपल्या कुठे कुठे गौण खनिज सुरू आहे. आणि त्यातील किती उत्खननाला परवानगी आहे. हे तपासून कारवाई करण्याचे अधिकार तलाठ्यांना असताना देखील तलाठ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे सिटी टाईम्सने ( Pune city times) केलेल्या पाहणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तर कोंढवा खुर्द ( Kondhwa khurd) व कोंढवा बुद्रुक ( Kondhwa budruk) मध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत गौण खनिज चालू असताना संपूर्ण कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक मध्ये फक्त ७ परवानगी दिल्याची माहिती पुणे सिटी टाईम्सच्या हाती आली आहे.

खुर्द मध्ये ३ तर बुद्रुकात ४ परवानग्या देण्यात आल्या आहेत. मग बाकिच्या ठिकाणी सुरू असलेले अवैध गौण खनिज कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे? यात बांधकाम व्यावसायिकांचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे सुत तर जुळलेलं तर नाही ना? असा प्रश्न प्रमाणिक पणे कर भरणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सर्व सामान्यांवर धडक कारवाई करणा-या महसूल विभागाला बांधकाम व्यावसायिकांचे एवढा पुळका का आला आहे? हे लवकरच पुणे सिटी टाईम्स जनते समोर आणणार आहे. क्रमशः

……..परवानगी दिलेली सर्वे नंबर……

कोंढवा खुर्द : स नं ११/१अ/३अ, १६अ/२, ११/१ब/६-११/१ब/७, कोंढवा बुद्रुक : स नं १९/१/१अ/१अ/१, ३२/३/२९, ६३/२, ५०/३अ ५०/३ब ५०/३०/२७ ५०/२/३ ५०/२/३/३,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here