कोंढव्यात विनापरवाना गौण खनिज उत्खनन केल्याबद्दल फक्त सहा जणांनाच नोटिसा!

0
Spread the love

२०१७ ते आजपर्यंत ६ प्रकरणांची सुनावणीच झाली नसल्याचे आले समोर.( Hearing)

वर्षाभरात एकही ७/१२ वर बोजा चढविलेला नाही.

माहिती अधिकारात सदरील प्रकार उघडकीस.बाकिच्या अवैध गौण खनिज उत्खननाचे काय?

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे उपनगर परिसरातील कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरात अवैध गौण खनिज करणा-यांवर कारवाई करण्याचा विसर तहसिल हवेली कार्यालयाला पडला आहे.

आज जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे इमारतींचे बांधकामामे सुरू आहेत. सदरील कोंढवा खुर्द मध्ये ठिकठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन चालू असून तहसिल हवेली कार्यालयाचा कारवाईकडे कानाडोळा होताना दिसत आहे. ( Kondhwa khurd,Kondhwa budruk Pune royalty news)

११ महिन्यात फक्त सहाच नोटीसा बजावून तहसिल हवेली कार्यालयाने धन्यता मानली आहे? स्थानिक नागरिकांना रोज डोळ्या समोर अवैध गौण खनिज उत्खनन दिस असताना, अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर काळा चष्मा असल्याने त्यांना सदरील विना परवाना चालू गौण खनिज ( royalty ) दिसानासे झाले आहे.

कोंढवा बुद्रुक स नं ४६/१अ/१ येथे परेश अमृतलाल शहा यांनी विना परवाना १५० ब्रास उत्खनन केल्याप्रकरणी १ सप्टेंबर २०१७ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.व स नं ५५,५६,५७पै. मध्ये ४२,४२४ ब्रास मुरुम-दगड उत्खनन केल्याबद्दल पाटील इंजिनियर्स प्रा. लि. यांना नोटीसा बजावून १६ ऑगस्ट २०१९ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.

तर कोंढवा खुर्द सर्वे नंबर ३८/४ व ३८/५अ/१ येथे विना परवाना मुरुम-दगड असे ८४८० ब्रास उत्खनन केल्याप्रकरणी अर्हम प्रॉपर्टीज तर्फे भागिदार प्रवीण शंकरलाल छाजेड यांची सुनावणी ९ नोव्हेंबर २०२० व स नं ५१/२ब/२३ मध्ये २१० ब्रास माती-मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी फिरोज समद खान व सुलताना अहमद खान यांची १४ सप्टेंबर २०२० तर स नं ६२/३अ तील जागेत १०५० ब्रास माती-मुरूम उत्खनन केल्याबद्दल जलालुद्दीन शहाबुद्दीन शेख यांना नोटीस बजावून १४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावण्या ठेवण्यात आल्या होत्या. सदरील नोटीसा ह्या तहसिलदार सुनिल कोळी यांच्या कार्यकाळात बजाविण्यात आल्या आहेत.

फक्त नोटीसा बजावून मोकळ्या होणा-या तहसिल हवेली कार्यालयाला शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असताना देखील दिसेना? नोटीसा बजावल्या जातात परंतु पुढील कारवाई का होत नाही? हा सर्व सामान्यांचा चर्चेचा विषय बनला आहे.

पुणे सिटी टाईम्स ( pune City times) प्रतिनिधीने हवेली तहसिल कार्यालयाकडे माहिती घेतली असता सदरील प्रकरणात अंतिम निकाल झाला नसल्याचे कळविण्यात आले आहे.सदरील प्रकरणात तहसिलदार तृप्ती कोलते ( trupti kolte) हे स्वतः लक्ष घालून शासनाचा महसूल वाढवण्यास प्रयत्न करणार का? हा येणारा काळच ठरवेल. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here