कुख्यात गुन्हेगार संतोष जगतापचा खून करणाऱ्या दोघांना घातक शस्त्रासह ३० तासाच्या आत केले जेरबंद.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स 24 ; प्रतिनिधी, वाळू व्यवसायिक संतोष जगताप याच्यावर दिवसाढवळया लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर गोळीबार झाला होता, त्यामध्ये
संतोष जगताप हा मयत झाला असून त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता, त्याबाबत लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत चालू असताना अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना आरोपीचे ठिकाणाविषयी माहिती मिळाली. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट -६ चे अधिकारी यांना माहिती देवून पथक नेमून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केल्याने त्यांचे
पथकासह सदर ठिकाणी जावु आरोपी १)‌ पवन गोरख मिसाळ ,वय-२९ वर्षे ,धंदा-खडी सप्लायर, रा. दत्तवाडी, उरळी-कांचन,हवेली,जि.पुणे २)महादेव बाळासाहेब आदलिंगे, वय-२६ वर्षे,धंदा-शेती,रा.जूनी तांबे वस्ती,दत्तवाडी,उरळी कांचन, हवेली,जि.पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे,
सहा पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,गणेश माने, सहा.पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,सुधीर
टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले,नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास
तांबेकर यांनी केली आहे.