“पुणे सिटी टाईम्स बातमीचा परिणाम”
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला कामांची लगीन घाई झाल्याने चुडामन तालीम ते भंडारशहा कब्रस्तान पर्यंत फुटपाथाचे कामे अबाड धबाड ठोकून ठेकेदार मोकळे झाल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.

त्या बातमीचा परिणाम असा झाला की संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची कानउघडणी करून निकृष्ट दर्जाचे केलेले फुटपाथावरील ब्लॉकचे कामे काही तासांतच सुरू करण्यात आली, झटक्यात कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सचे आभार मानले आहेत.

बातमी प्रसिद्ध झाली नसती तर हे पारदर्शक पणे निकृष्ट केलेले कामे झाली असती का? असा प्रश्न आज स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

परंतु ऐवढी कसली घाई त्या ठेकेदाराला झाली होती की घाईघाईने कामे आटपून मोकळे झाले? फुटपाथ दुरूस्ती करण्यात आली असली तरी काही दिवसताच फुटपाथवरील ब्लॉक निखळल्याने त्या ठेकेदारावरील कारवाईचे काय?
निकृष्ट दर्जाचे काम होऊनही अधिका-यांनी ठेकेदाराला बिले देऊन मोकळे झाल्याची चर्चा क्षेत्रीय कार्यालयात ऐकायला मिळत आहे. मग कामाच्या दर्जाची पाहणी कोणी व कसे केली?
आणि बिल देण्याची घाई का झाली? याचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ठेकेदाराने फुटपाथ दुरूस्त केले असले तरी त्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.