बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयात याचिका दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेत आहेत.तर देशाचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडं आहे. ते कधी मुंबईत परतणार, महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास ठराव कधी आणणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पण त्याआधीच त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीवेळी वेळोवेळी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रातील तफावतींबद्दल शिंदे यांच्या विरोधात पुण्यातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

“संग्रहित छायाचित्र”

या याचिकेमध्ये २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत.

अभिजित खेडकर व डॉ अभिषेक हरिदास यांनी एड.समीर शेख
यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय दंड संहिता कलम १९९,२००, लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५अ, अंतर्गत याचिका दाखल
केली आहे.

शिंदे यांनी २००९, २०१४, आणि २०१९ मध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणुकी करिता उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र सादर केले. त्यामध्ये अनेक तफावती आढळून आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

वाहनांच्या किंमतींमध्ये फरक २००९ च्या शपथपत्रात शेयर्स यामधील गुंतवणुकीमधील युनिटचा तपशील लपवण्यात आला आहे. तर तसेच आरमाडा MH०६M२३८८ हे मोटार वाहन ३०/०१/२००६ रोजी ९६,७२० रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे.

तर सन २०१४ च्या शपथपत्रात आरमाडा MH०६M२३८८ हे मोटार
वाहन २००६ रोजी ८,००,००० रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. यासह अन्य काही वाहनांच्या किंमतीमध्ये तफावत आढळून आली आहे.

………शेत जमीन खरेदी……

सन २००९,२०१४ च्या शपथपत्रात पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले आहे. तर २०१९ च्या शपथपत्रात पत्नीने सर्वे नंबर : ८४४,८४५, चिखलगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे २००९ रोजी जमीन खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तसेच शिंदे पती-पत्नीने २०१४ व २०१९ मधील शपथपत्रात व्यवसाय किंवा नोकरीच्या तपशिलात/उत्पन्नाच्या स्तोत्रांच्या
तपशिलात कोठेही ते शेतकरी असल्याचे नमूद केले नाही,असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. दुकानांचे गाळे,व्यावसायिक इमारत, निवासी इमारत खरेदीच्या किंमतीही तफावत आढळून आल्यात यात म्हटले आहे.

…..शाळेच्या नावातही तफावत?….

सन २०१९ च्या शपथपत्रात उच्चतम शैक्षणिक अहर्तेत न्यू इंग्लिश हायस्कुल ठाणे येथून १९८१ साली अकरावी पास असल्याचे नमूद केले आहे. तर सन २००९ च्या शपथपत्रात मंगला हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज ठाणे (पूर्व) येथून अकरावी पास असल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here