भवानी पेठेतील जुना मोटार स्टॅण्ड ते रांका हॉस्पिटल पर्यंत खड्डेच खड्डे,

0
Spread the love

भवानी पेठेत तोंड बघून अर्धवट डांबरीकरण केल्याचा नागरिकांचा आरोप.

एखाद्याचे अपघात झाल्यावर पुणे मनपा जागी होणार का?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जुना मोटार स्टॅण्ड ते रांका हॉस्पिटल पर्यंत काही दिवसांपूर्वी ड्रेनेज लाईनचे काम गाजावाजा करून करण्यात आले,

परंतु ते काम झाल्यावर सदरील ठिकाणी वारंवार माती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात व स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानात उडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सदरील ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरण केले,

ते सिमेंट काँक्रिटीकरण केल्यानंतर काहीच दिवसांत सदरील सिमेंट काँक्रिटीकरण काही ठिकाणाहून निखळले असल्याने जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तर सदरील ठिकाणी शादाब टॉवर ते रांका हॉस्पिटल पर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे.

डांबरीकरण करताना ठेकेदाराने व संबंधित अधिकाऱ्यांना तोंड बघून अर्धवट डांबरीकरण केल्याचा प्रकार दिसून येत आहे. विशेष म्हणजे ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर पुर्णपणे डांबरीकरण करणे अपेक्षित असताना अर्धवट डांबरीकरण केल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला आहे.

एका कार्यकर्त्याच्या हट्टापायी डांबरीकरण केले असून आम्ही प्रमाणिक पणे टॅक्स भरूनही पुणे महानगर पालिका व ठेकेदार आमच्याशी दुजभाव करत असल्याचा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी उप अभियंता मचाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जुना मोटार स्टॅण्ड ते भंडारशहा दर्गा रोड पर्यंत आम्ही काम केली आहे सदरील ठिकाणी २०-२० लाखांचे काम झाले आहे. त्यापुढे कोणी काम केले आम्हाला माहीत नाही.

रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज झाकण घातल्याने व व्यवस्थीत डांबरीकरण झाले नसल्याने दुचाकी घसरत आहे

सदरील ठिकाणी डांबरीकरण बाबतीत विचारणा केली असता मचाले यांनी फोन कट केला. नंतर त्यांनी फोन उचलला नाही. भंडारशहा दर्गा पासून पुढे मग कामे कोणी केली? व मचाले यांच्या भागात डांबरीकरण कोणी केले? काम करणारा ठेकेदार कोण? एकुण किती लाखांचे काम होते? ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न मचाले यांनी फोन कट केल्यने उपस्थित झाले आहे..क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here