कोंढव्यातील वक्फ बोर्डाची जागा प्लॉटींग करून विकण्याचा प्रकार.!

0
Spread the love

जागा वक्फ बोर्डाची भाडे मात्र चोरांना?

भाड्यात हिस्सेदारी कोणाकोणाची?

काही दिवसांपूर्वी वक्फ अधिका-यांनी लावलेले बोर्ड गुंडांनी केले गायब.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान,

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सर्वे नंबर ५५ मधील ४६ एकर ४ गुंठे ही जागा वक्फ बोर्डाची ( इनाम वर्ग ३ ) असतानाही काही राजकीय व्यक्तींना हताशी धरुन ती जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सदरील वक्फ बोर्डाच्या जागेवर मोठ्याप्रमाणावर अनधिकृतपणे अतिक्रमण देखील झाले आहे. जागा ही रोडलगत असल्याने त्या जागेचे भाव शेकडो कोट्यवधी रुपयांत असल्याने काही राजकीय व्यक्तींना धरून बिल्डरांना विकल्याचे समजतं आहे.

जागा वक्फ बोर्डाचे असूनही ही सदरील जागेवर पत्र्याचे शेड मारून भाड्याने देऊन मलाई चखली जात आहे.तर तो भाडा वक्फ बोर्डाला न जाता काही लोकांच्या खिशात जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

खरं तर वक्फ बोर्डाने ती जागा तारेचे कुंपण मारून ताब्यात घेणे अत्यावश्यक असताना तसं केलं नसल्याने काही ठिकाणी आज जागा मोकळीच आहे. विशेष म्हणजे सदरील बोर्डाच्या जागेवर पत्र्याचे शेड उभारले असूनही पुणे महानगर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही.

वक्फ बोर्डाने पुणे महानगर पालिके मार्फत कारवाईचा बडगा उगारला असता तर आज ही परिस्थिती आली नसती. या बाबतीत आता “पुणे सिटी टाईम्स”लवकरच पाठपुरावा करून यात सामिल असलेल्यांचे नावं जनतेसमोर उलगडा करणार आहे.

वक्फ बोर्डाच्या जागेचा सातबारा खासगी व्यक्तींच्या नावावर कसा?

सर्वे नंबर ५५ कोंढवा बुद्रुक ही जागा वक्फ बोर्डाची इनाम वर्ग ३, असताना तलाठी,नायब तहसीलदार, तहसिलदार यांना माहित नव्हते का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

खडी क्रशरला परवानगी दिली कोणी?

सदरील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत रस्ता बनविला जात असून त्या ठिकाणी एका इसमाकडून खडी क्रशर चालविले जात असून त्याला परवानगी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित झाला असून याबाबत वक्फ बोर्ड अनभिज्ञ असल्याचे समज आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here