पोलिस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाईचे काय?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुण्यातील पब संस्कृतीवर कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये ( पब) खळबळ उडाली होती. आणि ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयुक्तांचे आदेशाची पायमल्ली केली गेली, त्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई करण्यात आली.
परंतू कोरेगाव पार्क मध्ये पोलिस आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून रात्री ३ वाजेपर्यंत प्लंज रेस्टो बार चालू असल्याचे दिसून आले आहे.
पोलिस आयुक्तांनी जास्तीतजास्त रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. आणि त्या संदर्भातील आदेश सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आले आहे. परंतु पैसा..पैसा.. पैसा.. सबको चाहिये पैसा.. म्हणत कारवाईकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठं काय काय होतंय हे वसुली बहादुर व ठाण्यातील सर्वांना माहीत असते? मग ठाण्याच्या प्रमुखांना माहिती नसणार का? छोट्या छोट्या दुकानांवर ” सिंघमगिरी “ दाखवणाऱ्यांना पब कसे दिसत नसतील? असा प्रश्न उपस्थित होते आहे. आता यावर पोलिस आयुक्तांची काय भुमिका असणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे. क्रमशः