तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव करुन खुन करणा-या आरोपी आईला पोलिसांनी केली अटक,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स 24 ; प्रतिनिधी
स्वताच्या मुलीचे अपहरण झाल्याचा कांगावा करणा-या आईनेच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरील महीलेची ३ महिन्याची लहान मुलगी २२ ऑक्टोबर रोजी सर्वे नं. १०, लक्ष्मीमाता मंदिरचे मागे, भाजी मार्केट, येरवडा पुणे येथून फिर्यादीचे राहते घरातुन कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे समंती शिवाय, अज्ञात कारणांसाठी पळवून नेले म्हणून तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने येरवडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात
आलेला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली रविंद्रकुमार वारंगुळे, पोलीस उप
निरीक्षक हे करत होते. दाखल गुन्हयाचे तपासात फिर्यादी व त्यांचा लहान मुलगा यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता फिर्यादी हि घटस्फोटीत असुन तीला अनैतिक संबंधातुन ३ महिन्यापुर्वी मुलगी झाली होती.नातेवाईकांत काय सांगायचे या कारणावरुन फिर्यादी हिनेच त्यांचे राहते घरात तीचे ३ महिन्याचे
लहान मुलीचे तोंड दाबुन तीला जीवे ठार मारले व तीच्याच १३ वर्ष वयाच्या मुलाचे मदतीने मृतदेह गोणीत
बांधुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकुन दिला असल्याचे सांगितल्याने सदर मृतदेहाचा शोध घेतला असता
मृतदेह मिळुन आल्याने तो शवविच्छेदनाकरिता ससुन हॉस्पीटल येथे पाठविण्यात आला आहे.
सदर गुन्हयात मृत मुलीची आई व तीचे १३ वर्षाचे मुलास (विधी संघर्षग्रस्त
बालक) ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयात भा.दं.वि. कलम ३०२,२०१, ३४ प्रमाणे वाढ करण्यात आली असुन पुढील तपास विजयसिंह चौहान, पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा पोलीस ठाणे हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ४, रोहिदास पवार, सहा.पोलीस आयुक्त, येरवडा विभाग किशोर जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयसिंह चौहान, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे, किरण लिट्टे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर,पोलीस नाईक तेजस भोसले, सिध्दाराम पाटील, अमजद शेख, शुभांगी चव्हाण, विष्णु ठाकरे, अनिल शिंदे, यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here