६ जणांचे गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
चार चाकी गाड्याचे सायलेन्सर चोरून धुमाकूळ घालणा-या ६ चोरांना गुन्हे शाखा युनिट ५,ने कारवाई करत अटक केली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सायलेन्सर चोरी करणारे इसम हे म्हाडा सोसायटी, हडपसर येथे थांबलेले आहेत. बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, यांचे आदेशान्वये म्हाडा सोसायटी येथे जावुन १) आरिफ सलीम शेख वय १९ वर्षे रा. बिल्डींग नंबर २, फ्लॅट नंबर ४०८, म्हाडा सोसायटी, हडपसर पुणे २) हुसेन बढेसाहब शेख वय २३ वर्षे रा.बिल्डींग नंबर २, फ्लॅट नंबर ११६, म्हाडा सोसायटी,हडपसर पुणे ३) साहील वसीम शेख वय १९ वर्षे रा.स.नं. १५,रिध्दीसिद्दी अपार्टमेंट जवळ, वैदवाडी, हडपसर पुणे.
४) सहजाद अक्रम खान वय १९ वर्षे रा.स.नं. १५, रिध्दीसिद्दी अपार्टमेंट जवळ, वैदवाडी, हडपसर पुणे ५) रहिम खलील शेख वय २४ वर्षे रा.स. नं.११०, कोठारी व्हिल्स जवळ, रामटेकडी, हडपसर पुणे ६) सोहेल सलीम खान वय २३ वर्षे रा.गुलामअलीनगर, लेन नंबर ६, दुमशा टॉवर जवळ, श्रीराम चौक, महंमदवाडी रोड, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी,मुंढवा, मांजरी भागात गाड्यांचे सायलेन्सर चोरी करुन त्या सायलेन्सर मधील कनर्व्हटर मधील मौल्यवान फ्लॅटिनम धातु मिश्रीत माती काढुन ती परराज्यातील आरोपींना विक्री केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
आरोपीकडुन ३ लाख २० हजार रूपये किंमतीचे १६ सायलेन्सर जप्त करणेत आलेले आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे हे करीत असुन आरोपी कडुन एकुण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे व चैताली गपाट,पोलीस अंमलदार रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड,
दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटो,शशीकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, अमित कांबळे, विलास खंदारे, अमित कांबळे, संजयकुमार दळवी व महिला पोलिस अंमलदार स्वाती गावडे यांनी केलेली आहे.