पैशांच्या देवाण- घेवाणीतून ६ महिन्यांपूर्वी झाला होता वाद.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या एका तरूणावर गोळीबार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्तांनी कितीही मोकका दाखल केले असले तरी व कारवाईची कंबर कसली तरी आज काही पुण्यातील गुन्हेगारी थांबायला तयार नाही. समिर हुसेन मनुर वय ३० रा. फालेनगर, भारती विद्यापीठ,असा खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
आरोपींनी एकुण ६ गोळ्या फायर केल्याचे बोलले जात आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी एकाला काहि तासांतच अटक केली आहे. तर त्याचे इतर दोन साथिदार फरार झाले आहे.
आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पोलीसांनी मेहबूब सैफन बनोरगी याला ताब्यात घेतले आहे.
तो समीरचा मित्र होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत समीर मनूर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे जुने मित्र मेहबूब सैफन बनोरगी यांच्यासोबत झालेल्या पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारातून बनोरगी आणि त्याच्या साथिदारांनी शेख यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खून केला आहे.
मयत आणि आरोपी यांच्यामध्ये मागील सात महिन्यापासून वाद होता, असेही पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील दोन आरोपी हे जनता वसाहतमधील आहेत. त्यांच्यात पैशांच्या देवाण- घेवाणीतून ६ महिन्यांपूर्वी वाद झाला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी त्यांच्यातील हा वाद मिटवून घेतला होता. पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.