पुणे सिटी टाईम्स (𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
प्रजासत्ता दिनाच्या दिवशी मघ विक्री करणे बेकायदेशीर असताना पुणे कॅम्प परिसरात मघ विक्री केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कादिर शेख व समीर पटेल यांना त्यांचे बातमी दाराकडून बातमी मिळाली की,पुना कॉलेजचे मागील बाजुस न्यु मोदीखाना २३८९ कॅम्प पुणे येथे एक इसम स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता लोकांना विनापरवाना अनाधिकाराने बेकायदेशीररीत्या विदेशी दारू विक्री करीत आहे.
अशी बातमी मिळाल्याने प्रभारी अधिकारी क्रांतीकुमार पाटील यांना अवगत करता, त्यांनी स्टाफला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सदर इस्मास ताब्यात घेतले आहे. रोहित हनमंत धोत्रे वय २८ वर्ष रा. ३८९ न्यु मोदीखाना कॅम्प, पुणे असे त्याचे नाव आहे.याची अधिक माहिती घेतली असता सदर अवैध दारू विक्री हा त्याच्या घरासमोर करीत असल्याचे त्याने सांगितले.९९ हजार ८२० रूपयांची देशी विदेशी दारू मिळून आली. सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीची मेडिकल तपासणी करून त्यास लष्कर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. लष्कर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुनील पवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली कांबळे , पोलिस अंमलदार शंकर नेवसे,कादिर शेख, समीर पटेल, आबा मोकाशी,साधना ताम्हाणे, उत्तम तारू, नागनाथ राख,या पथकाने केलेली आहे.