पुण्यात भरदिवसा तरुणाचा खून; भररस्त्यात तलवारीने सपासप वार,

0
Spread the love

लग्नाचा टिळा लावण्यापूर्वीच तरुणाचा खून.

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, तरूणाचा भररस्त्यावर खून झाल्याने कोथरुड येथे खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू परिसरात लग्नाचा टिळा लावण्यासाठी निघालेल्या तरूणाचा भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला.

भरदिवसा या खुनाचा थरार घडला असून, खून पाहणाऱ्यांच्या देखील अंगाचा थरकाप उडाला होता. हा प्रकार समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अनिल राजेंद्र जाधव वय २१, रा. डहाणूकर कॉलनी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.अनिल जाधव याचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा कार्यक्रम रात्री होता. त्याची घाई सुरू होती.

त्याची एक बहिण डहाणूकर कॉलनीतील लक्ष्णीनगर येथे राहत होती. तर, एक बहिण कर्वेनगर येथे राहण्यास होती. तो दोन्ही बहिणीकडे ये-जा करत असत व अधून-मधून राहत देखील.दरम्यान, एका बहिणीला सोडण्यासाठी तो लक्ष्मीनगर येथे आला होता. बहिणीला सोडून तो दुचाकीने पोतनीस परिसरातून केफिप्टी रस्त्याने जात होता.

त्याचवेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. तलवारीने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. भररस्त्यात त्याच्यावर हा हल्ला झाला. रक्तस्त्राव झाल्याने अनिल याचा जागीच मृत्यू झाला.

हल्लेखोर पसार होताच नागरिकांनीही माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here