पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पतीला सुट्टी न मिळाल्याने पोलिसाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचे पती पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. पतीला सुट्टी मिळाली नसल्याने दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे. जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे पती वाहतूक शाखेत नेमणूकीस आहे. तर त्या स्वत: येरवडा कारागृहात पोलीस आहेत. वाहतूक शाखेच्या नियोजन विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर चलक असलेल्या कर्मचाऱ्याला किरकोळ सुट्टी हवी होती. मात्र, ती मिळत नव्हती. यातच त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्या देखील काही कारणास्तव रद्द करण्यात आल्या होत्या.
पोलीस कर्मचाऱ्याची रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. दोघांनी काल खरेदी व चित्रपट पाहिला. आज सोमवार त्यांच्यामध्ये सुट्टी घेण्यावरुन वाद झाला. पत्नी त्यांना सुट्टी घेण्यास सांगत होती, मात्र पतीने सुट्टी नसल्याचे सांगितले. यावरून दोघांत वाद याला. पतीने सुट्टी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. वरिष्ठांशी याबाबत बोलणे झाले नव्हते. शनिवारी वरिष्ठांना घरी सोडण्यास गेल्यानंतर कर्मचाऱ्याने सुट्टी बाबत विचारणा केली होती.
मात्र वरिष्ठांनी काहीच उत्तर दिले नाही.काल साप्ताहिक सुट्टी घेतल्यानंतर आजच्या सुट्टी त्यांनी वरिष्ठांना फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी सुट्टी नसल्याचे पत्नीला सांगितले. तुम्हालाच कशा सुटटया मिळत नाहीत, असे म्हणून साप्ताहिक सुट्टी घेतल्यानंतर आजच्या सुट्टीबाबत त्यांनी वरिष्ठांना फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. म्हणून त्यांत वाद झाला. पती काहीच न बोलता आंघोळीला निघून गेले. त्यानंतर पत्नी रागात खोलीत निघून गेली. पतीला संशय आल्याने त्यांनी बाथरुममधून बाहेर आले.
त्यावेळी त्यांचे वडील देखील घरात होते. दोघांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पत्नी गळफास लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्या दोघांनी जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती मिळताच कोथरुड वाहतूक विभाग, कोथरुड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतला. यानंतर याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली.