अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
एका महिला पोलिसाशी अनैतिक संबंध ठेवून त्याची बदनामी करणा-या पोलिस शिपायाला अटक करण्यात आली आहे.महिला पोलीस शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तिला वारंवार मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.तिचे अर्धनग्न फोटो काढून मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी संदीप कुंडलिक जाधव याला अटक केली आहे.सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२० पासून सुरु होता. याबाबत एका महिला पोलीस अंमलदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद गु. रजि. नं. २५३/२२दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले.इतर मुलींशी अनैतिक संबंध ठेवून फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली.
त्यांना वारंवार मारहाण करुन मारुन टाची धमकी दिली.त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली. पोलिसांनी जाधव याला अटक केली असून खडक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत