पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा,

0
Spread the love

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चालू होता जुगार अड्डा.

१ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्येच जुगार अड्डा चालत असल्याने नागरिकांच्या भुया उंचावल्या आहेत. कोणी विचारही केला नसेल की कित्येक दिवसांपासून चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा घातल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ससुन हॉस्पीटल सर्वंट क्वार्टर्स, कंपाउंड भिंतीलगत पत्र्याचे बंद खोलीतबेकायदेशीरपणे पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असलेबाबतची माहीती सामाजिक सुरक्षा विभागाला प्राप्त झाली, बातमीची खात्री केली अराता शाबीद हसन शेख, वय ४९ वर्षे,रा. १३/२ नानापेठ पुणे,आयुब हसन शेख हे त्यांचे जुगार घेणारे साथीदार १) राहुल रामनरेश गुप्ता,वय २७ वर्षे,रा.


लेन नं.१२,एस आर ए बिल्डींग डि ९०७,कैलास सुपर मार्केट जवळ, विमाननगर पुणे, (२)शुभम हरिश्चंद्र तळेकर,वय २६ वर्षे,रा.केम, ता. करमाळा,जि.सोलापुर,(३)सचिन सुर्यकांत गुरव वय ४३ वर्षे, रा.स.नं. ६७,कपीलेश्वर नगर अहमदनगर (४)सिध्दप्पा यल्लप्पा मुळगुंद,वय ३८. वर्षे,रा.मालधक्का,(५)अजय रघुनाथ यल्लमवार,वय ४० वर्षे,रा.सेंव्हन लव्हज बँक ऑफ महाराष्ट्र चे बाजुला,स्वारगेट, (६)अक्षय नारायण पाटील,वय २३ वर्षे ,रा.रेल्वे स्टेशन फिरस्ता,पुणे,

यांचेसह मिळुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर पणे
अंदर बाहर हा पत्त्यांचा जुगार पैशांवर घेत असताना दिसून आले तसेच किशोर मंजुनाथ तलवार,वय ४० वर्षे ,रा.३९४ बुधवार पेठ पुणे, आनंद हनमंतराव मराठे,वय २७ वर्षे, रा.विगनी वस्ती,ता.दौड,जि. पुणे,

राहुल काशिनाथ हजारे,वय ४१ वर्षे,रा.६११ भवानी पेठ,जावेद चाँदखान पठाण, वय ५४ वर्षे,रा.२९४ गोखलेनगर, राकेश गोपाळ राठोड,वय २६ वर्षे,रा.१७ क्विन्स गार्डन,आउट हाउस,सलमान हुसेन शेख,वय २० वर्षे ,रा.४८२ गुरुवार पेठ,अमित मारुती पुजारी, वय ३६ वर्षे,रा.गल्ली नं.२६,

घर नं.१५,ताडीवाला रोड,पुणे,उमेश गोरख सावंत,वय ३० वर्षे, रा. गल्ली नं.१०,पाटील इस्टेट,शिवाजीनगर,रफिक अब्दुल शेख,वय ३६ वर्षे, रा.२२६ मंगळवार पेठ,हनुमंत धोडींबा मोरे,वय २५ वर्षे,रा गॅरा गोडावुन शेजारी, दौड,ता.दौड, संतोष गुरुलिंग चनशेट्टी,वय ४३,रा. मिल्ट्री कॉलणी,हडपसर व इतरांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्त्यांचा जुगार खेळत अराताना १ लाख ४८ हजार ८० रुपयांच्या मुद्देमालाराह मिळुन आलेने महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ),४(अ),५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभाग,तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक पंढरकर, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, अश्विनी केकाण,संदिप कोळगे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here