वानवडीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असताना पोलिसांची रेड

0
Spread the love

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

वानवडी मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून ४ पिडीत मुलींची सुटका केली आहे.व्हीआयपी फॅमिली स्पा सेंटर, केदारी नगर, वानवडी,येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने,सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवुन खात्री केली असता,

मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करण्यात आली, ४ पिडीत महिला त्यापैकी १ झारखंड, १ मिझोराम,१ मणिपूर व १ थायलंड देश यांची सुटका करण्यात आली आहे.

स्पा सेंटरची महिला मॅनेजर स्पा मॅनेजर प्रिती विकास गायकवाड, वय ३३ वर्षे रा.कृष्णा नगर,महंमदवाडी, हडपसर, स्पा मालक- अंकुश जाधव, रा.स.नं २५६/१,लोहगाव,ता.हवेली जि. पुणे यांचेविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं३६७ / २०२२ भारतीय दंड विधान ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी महिला स्पा मॅनेजर हिला व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विजय कुंभार तसेच पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके,महिला पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार,राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here