एंजटांचे काम तत्परतेने तर नागरिकांना वेट ॲन्ड वॉच?
लोकसेवा कायद्याला थेट केराची टोपली.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील अन्न धान्य ब परिमंडळ कार्यालयात नागरिकांना फक्त चकरावर चकरा मारायला लावले जात असल्याने नागरिकांची दमछाक उडाली आहे. नागरिकांची दमछाक होत असताना नागरिकांची कामे कासव सारख्या संत गतीने करायची आणि एंजटांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एखाद्या नागरिकांने नाव कमीच्या दाखल्यासाठी अर्ज केला तर लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत ३ दिवसांत देणे बंधनकारक आहे.

परंतु ब” परिमंडळ विभागाला त्या कायद्याचे देणेघेणे नाही. देणेघेणे फक्त त्वरित मिळणाऱ्या मलईशी? एका अर्जदाराने ४ मे २०२३ रोजी रितसर नाव कमीचा दाखल्यासाठी अर्ज केला होता. त्यावर कामकाज करून ७ मे ला दाखला मिळणे बंधनकारक होते. परंतु चकरा मारूनही १६ मे पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत दाखला देण्यात आला नाही.

तर क्लार्क म्हणतो वेळ नाही. अधिकारी गायब, आणि एंजटांकडे गेले तर जास्त रक्कमेची मागणी? मग नागरिकांसाठी का परिमंडळ कार्यालय ठेवलयं? एंजटांकडेच कामकाज सोपवा मग? असा रोजचा रोष परिमंडळ कार्यालयात पाहिला मिळत आहे. लोकसेवा हमी कायदा धाब्यावर बसविणाऱ्या सर्वांवर अन्न धान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा लोकसेवा आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येईल असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.