पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
कोंढव्यातील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह रुग्णालयासमोर नागरिक अधिकार मंचाच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले आहे.२२ ऑगस्ट २०२२ पासून मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मध्ये सोनोग्राफी सुविधा नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. कोंढवा भागामध्ये गोर गरीबांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे.
सोनोग्राफी सुविधा बंद असल्याने नागरिकांची हाल होत असून कोंढवा भागामध्ये जवळपास तीन ते चार सरकारी रग्णालय आहे माँ खदीजा र अ ,हजरत ख्वाजा गरीब नवाज़ र अ, मॉसाहेब मीनाताई ठाकरे असे दवाखाने आहेत. परंतु एकही रुग्णालय मध्ये सोनोग्राफी सुविधा नाहीये तरी आपण तबाड़तोप रुग्णालय मध्ये सोनोग्राफी केंद्र परत चालू करावे अशी मागणी करत समीर शफी पठाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मीनाताई ठाकरे रुग्णालय मध्ये पुणे मनपाचे निषेध आंदोलन करण्यात आले,
रुग्णालय मध्ये डॉक्टरांना निवेदन देऊन येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जर सोनोग्राफी केंद्र परत चालू करण्यात आले नाहीतर भविष्यात मोठा जनांदोलन छेडण्यात येईल असा इशारा समीर शफी पठाण यांनी दिला आहे.
त्यावेळेस समीर शफी पठान , निखिल रोकड़े ,अनवर खान ,मुजाहिद खान,आफताब शेख ,रियाज़ बागवान , महेश दुबे,एडवोकेट शाहबाज़ शेख ,करीम शेख ,वाहिद सज्जन ,इक़बाल शेख, तौसीफ मुजावर ,ताजुद्दीन मेमन शुभम फ़ासगे ,रौनक ढवले ,अज्जू मुंशी ,विक्रांत जगताप ,फिरोज खान ,अज़हर बावा शेख ,अरशद शेख ,साजिद शेख ,नईम शेख ,खालिद सज्जन उपस्थित होते.