पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने लाखो रुपये खर्च केलेल्या भाजी मार्केटची लाखो रुपयांची थकबाकी उघड, पुणे सिटी टाईम्स पाठपुरावा

0
Spread the love

ज्या मार्केट मध्ये भाजी विक्रेते वर्षानुवर्षे बसत नसल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने लाखो रुपयांची उधळपट्टी कोणाच्या दबावामुळे केली?

विना परवाना मार्केट मध्ये पानटपरी कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे?

पुणे महानगर पालिका आयुक्तांनी चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

वापर विना पडलेल्या मार्केटला भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने लाखो रुपयांची उधळपट्टी करून दारूडयांना चांगलेच मोकळे रान करून दिले आहे.पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जुना मोटार स्टॅन्ड येथे भवानी पेठ भाजी मार्केट म्हणून कित्येक तरी वर्षा पासून मार्केट अस्तित्वात आहे.ते भाजी मार्केट विना वापर पडून राहून ही मार्केटवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने सन २०१७ ते आजतागायत मेंटेनन्स च्या नावाखाली लाखो रूपयांची उधळपट्टी करून स्वहित जपल्याचे बोलले जात आहे.

जे मार्केट भाडयाने देण्यात आल्याचे बोलले जात असले तरी आजरोजी एकदाही स्थानिक नागरिकांना भाजी विक्रेते भाजी विकताना दिसून आलेले नाही. उलट भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने ५ वर्षात अंदाजे ३० ते ४० लाख रुपये खर्च केल्याची चर्चा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात रंगली आहे.

तसेच पुणे सिटी टाईम्सने पाठपुरावा केला असता अनेक बाबी उघड झाल्या आहेत. भाजी मार्केट मध्ये एकुण २६ गाळे असून त्यातील ४ गाळे हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कोठी कार्यालय म्हणून देण्यात आले आहे. तर सदरील गाळे हे सन १९७८ साली पासून २२ जणांना वाटप केले आहे. परंतु त्या वेळी पासून आजतागायत गाळे धारक तेच थांडमाडून बसलेले आहेत.

मागील बातमी >>> पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने लाखो रुपये खर्च केलेल्या भाजी मार्केट मध्ये रोजच रंगत आहे दारुड्यांची पार्टी

परंतु एवढी वर्षे ते गाळे धारक जिंवत आहे का? या बद्दल जाणून घेण्याची अधिका-यांनी तसदी घेतली आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. सदरील गाळे हे राजकीय पक्षाच्या चेले चपाटयांना वाटप केल्याचे बोलले जात आहे. तर अधिक माहिती घेतली असता ते गाळे विना वापर पळूनही सन २०१८ सालापर्यंत त्याचे नाममात्र भाडे भरण्यात आले आहे.

परंतु त्या नंतर पुणे महानगर पालिकेने नविन नियमावली नुसार भाडे ३ हजार रुपये केल्याने ते भाडे आज हजारो रूपयांची थकबाकी वाढली आहे. त्या वसुली संदर्भात पुणे महानगर पालिकेच्या महात्मा फुले मंडई विभागाने नोटीसा गाळे धारक जागेवर नसल्या कारणाने गाळ्यांना सदरील नोटीसा चिटकवले आहे.

“वर्षानुवर्षे गाळे धारक आणि त्यांची थकबाकी”

शंकर कान्हू सरोदे (३५ हजार ९००), बिरू मल सखाराम पिलाने (३५ हजार ९००), नर्मदा बर्मल पिलाने (३५ हजार ९००), राजेश माणिक चव्हाण (३५ हजार ९००), नजिरा सय्यद रहिमान (३५ हजार ९००), राकेश दत्तात्रय धुमाळ ( २८ हजार ६०८), रविकांत बाबुराव माने,(३५ हजार ९००), दिगंबर बबनराव राऊत (३५ हजार ९००), पार्वती रविकांत माने (३५ हजार ९००), मैनुजा बी हकीम अ रहिमान (३५ हजार ९००) हुसेनबी इन्साफ शेख (३५ हजार ९००), दिपाली उर्फ बबीता भरत चव्हाण (३५ हजार ९००), नैकानिसा मोहम्मद मोमीन (३५ हजार ९००),राधेश्याम जवाहरलाल गुप्ता (३५ हजार ९००),प्रीतम सुगल परदेशी ( ३५ हजार ९००), असे थकबाकी दारांचे नावे असून त्यांच्या कडील ७ लाख ८२ हजार ५०८ रूपये थकबाकी येणे असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here