मुंढवा पोलिसांचा कारवाई मध्ये पण दुजाभाव? गोंधळ घालणाऱ्या विरोधात गुन्हा तर उशिरा पब चालू ठेवणाऱ्याला अभय?
सर्व सामान्यांचे हॉटेल रात्री ११ च्या आत बंद करणारे पोलिस वॉटर्स बार अॅन्ड किचन रेस्टॉरंट रात्री ३ वाजेपर्यंत सुरू कोणाच्या आदेशाने चालू आहे पब.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरात सध्या पब संकृती जोमाने चालू असून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत पब चालू असल्याने पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असला तरी स्थानिक पोलिस डोळयावर काळी पट्टी बांधून बसलेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. काही दिवसांपूर्वी ५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री (१:३०) दीडच्या सुमारास वॉटर्स बार अॅन्ड किचन रेस्टॉरंट मध्ये “कव्वालीचा” कार्यक्रम सुरू असताना पैंशाची उधळण मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यातून दोन पब चालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती.
त्यात काही जखमी देखील झाल्याचे बोलले जात आहे. परंतु पुणे शहर पोलिस लहान हॉटेल व्यावसायिकांना रात्री दहा-अकरा वाजता इमानेइतबारे बंद करायला लावतात. परंतु मोठे मोठ्या धंदेवाईकांचे पब, बार, रेस्टॉरंट रात्री दोन-दोन तीन-तीन वाजेपर्यंत धांगडधिंगा घालत असताना दिसत आहे. मात्र त्यावर इमानेइतबारे पोलिस मुंग गिळून गप्प बसत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळाले आहेत.
दर शनिवार रविवार पुणे शहरातील ९९℅ रेस्टॉरंट, बार ( पब) पहाटे पर्यंत चालू असतानाचे खात्रीलायक सुत्र आहे. पोलिसांना मिळणाऱ्या मलाई मुळे पब संस्कृती पुणे शहरात जन्माला आली आहे. तर विषेश म्हणजे ५ ऑगस्ट रोजी वॉटर्स बार अॅन्ड किचन रेस्टॉरंट मध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात भांडण झाल्याने, भांडणे करणाऱ्यांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु उशीरा बार रेस्टॉरंट उघडे ठेवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे वॉटर्स बार अॅन्ड किचन रेस्टॉरंट वर कोणत्याही प्रकारची पोलिसांनी कारवाई केली नसल्याने पोलिसांचा दुजाभावा दिसून आला तर आहे. परंतु वसुली बहाद्दाराच्या आशिर्वादाने रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगाला परवानगी असल्याचे बोलले जात आहे. तो वसुली बहाद्दार कोण? याचा उलगडा पुणे सिटी टाईम्स लवकरच करणार आहे. ( क्रमशः)