पुणे सिटी टाईम्स बातमीचा परिणाम; घोरपडे पेठेतील मुस्लिम कब्रस्तानची अखेर साफसफाई,

0
Spread the love

उपायुक्त अजित देशमुख यांनी बातमीची घेतली दखल.

        " पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट "

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, अजहर अहमद खान

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून घोरपडे पेठेतील मोमीनपुरा कब्रस्तान मध्ये जिते तिथे कचरा व गवत उगवलयाचे दिसून येत होते. वारंवार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करूनही भवानी पेठ क्षेत्रीय

कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याने लोकहित फाउंडेशन पुणे ने त्वरित साफसफाई न झाल्यास अधिका-यांच्या टेबलावर कचरा टाकून आंदोलन केले जाईल असा आंदोलनाचा इशारा दिला होता.

तर अधिकार पुणे घोरपडे पेठ येथील न्यू मोमीनपुरा येथील कब्रस्तानकडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा कानाडोळा या सत्राखाली ” पुणे सिटी टाईम्सने ” बातमी प्रसिद्ध केली होती.

मागील बातमी, घोरपडे पेठेतील मोमीनपुरा कब्रस्तानकडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा कानाडोळा,

खळबळून जागी झालेली यंत्रणेने त्या बातमीची दखल घेऊन त्वरित साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तर आता रोज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कर्मचारी साफसफाई करून वाढलेली गवत काढण्याचे काम केले जात आहे.

सदरील मोमीन पुरा कब्रस्तान मध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील डीएसआय मुख्तार सय्यद, एसआय पाटोळे, मुकादम महेंद्र चव्हाण, मेहबूब पठाण हे रोजचे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here