“पुणे सिटी टाईम्स” बातमीचा परिणाम ; कोंढव्यात चालू गौण खनिजाची तलाठ्यांनी केली पाहणी,

0
Spread the love

कोंढव्यात उडाली खळबळ, दोन दिवसात तहसिलदारांची होणार भेट? ( Pune city impact news )

    "पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट"

पुणे सिटी टाईम्स; प्रतिनिधी. पुणे शहरातील उपनगर परिसरातील कोंढवा भागात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिज सुरू असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.

गौण खनिज उत्खनन तर केले जाते परंतु परवानगी न घेता राजरोसपणे अवैध गौण सुरू असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे या सदराखाली दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्याची दखल घेत तहसिलदार हवेली तृप्ती कोलते पाटील यांनी थेट कात्रज येथील तलाठी कार्यालयाला काल दि २४ नोव्हेंबर रोजी भेट दिली, खळबळून जागे झालेली यंत्रणा कामाला लागली असून आज २५ नोव्हेंबर रोजी कोंढवा खुर्द भागातील काहि परिसरात चालू असलेले गौण खनिजाची पाहणी तलाठी अर्चना वनवे यांनी पुणे सिटी टाईम्सचे संचालक अजहर खान व सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांच्या सोबत केली आहे.

येत्या दोन दिवसांत पंचनामे व कारवाई केली जाईल असे आश्वासन तलाठी अर्चना वनवे यांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत सदरील भागात पाहणी‌ करण्यासाठी स्वतः तहसिलदार हवेली तृप्ती कोलते हे विजीट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तलाठ्यांची पाहणी तर झाली आता किती दिवसात पुढील कारवाई होईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here