पुणे घोरपडे पेठ- मोमीनपुऱ्यातील त्या केटरिंग वाल्याचा किसाळवाणा प्रकार; गटारीच्या पाण्यातच बनवितोय जेवण. व्हिडिओ व्हायरल

0
Spread the love

आरोग्य विभाग काढतोय झोपा जुबेर केटर्स नागरिकांच्या जीवाला वाढवतोय धोका?

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष का?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील घोरपडे पेठ- मोमीनपुऱ्यातील एका केटरिंग वाल्याचा किसाळवाणा प्रकार समोर आला असून गटारीच्या पाण्यातच जेवण बनवित असल्याचा खळबळजनक प्रकार व्हिडिओत दिसू लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घोरपडे पेठेतील मोमीनपुऱ्यातील दफनभूमी समोर जुबेर केटर्स या नावाचा केटरिंग व्यावसायिक आहे. सदरील ठिकाणी जेवणासाठी नागरिकांची चांगलीच वर्दळ असते, परंतु सदरील ठिकाणी आतमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे अनेकांनी या बाबतीत निराशा व्यक्त केली होती.

परंतु काही पुणे महानगर पालिकापोलिसांसोबत असलेले संबंधामुळे त्या केटर्स चालकावर कारवाई केली जात नव्हती? आता पावसाळा सुरू असताना गटारीचे पाणी दुकानात शिरले असताना तेथे साफसफाई व स्वछता राखने त्या केटरिंग चालकाचे काम असताना सदरील केटरिंग चालकाने दुर्लक्ष करून त्या गटारीच्या पाण्यातच जेवण बनवित असल्याचा किसाळवाणा प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे.

👉👉 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक }}} धक्कादायक.. पुणे घोरपडे पेठेतील केंटरिग चालकाचा किव आणणारा प्रकार,गटारीच्या पाण्यातच बनवितोय जेवण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 😳😳

यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्या परिसरातील सर्व केटरिंगचे दुकानांची कडक तपासणी करण्याची मागणी होत आहे. हॉटेल व केटरिंग चालकांची तपासणी करणे ही जबाबदारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाची व अन्न व औषध प्रशासनाची असल्याने, तपासणीच केली जात नसल्याने असे उद्योग समोर येत आहेत. तर स्थानिक नागरिकांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here