पुणे कसबा विधानसभा निवडणूक तोंडावरच असताना भाजपाला झटका; रशिद शेख यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

0
Spread the love

कसबा विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले.

रशिद शेख हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व जाणले जातात,तर त्यांची राजकारणात चांगलीच पकड आहे.

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) अजहर खान

पुणे शहरातील कसबा, चिंचवड विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने कसबा मध्ये जोरदार लढत होणार आहे. कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपवासी झालेले रशिद शेख यांनी कसबा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपाला चांगलाच फटका बसला आहे.

रशिद शेख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुणे केन्टोन्मेंटची जागा काँग्रेस पक्षाला अगदी थोडक्यात गमवावी लागली होती. आता रशीद शेख यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेसची ताकद पुण्यात वाढणार असे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत रशिद शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,आमदार संग्राम थोपटे,शहराध्यक्ष अरविंद शिंदे,माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी नगरसेवक रफिक शेख आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.दरम्यान, रशिद शेख यांचे बंधू रफिक शेख हे काँग्रेसचे आहेत.

त्यांच्या लोहियानगर- कासेवाडी प्रभागातील जवळपास २० हजारांहून अधिक मतदार कसबा विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे रशिद शेख यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फटका भाजपला बसू शकतो, असे बोलले जात आहे. यावेळी बोलताना रशिद शेख यांनी काँग्रेस उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here