" पुणे सिटी टाईम्स इंपॅक्ट "
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील कोथरूड नळस्टॉप येथे भाग्यश्री साळुंखे या तरूणीकडून कोथरूड वाहतूक विभागातील पोलिस कर्मचाऱ्याने चिरीमिरी घेतल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्याने वाहतूक शाखेत खळबळ उडाली आहे. कोथरुड वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संग्राम लक्ष्मण पवार यांना तकडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
संग्राम पवार यांच्या निलंबनाचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी मंगळवारी १२ डिसेंबर २०२३ रोजी काढले आहेत. कर्तव्य करत असताना बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलीस खात्यास अशोभनिय असे गैरवर्तन केले आहे.यामुळे संग्राम पवार यांना १२ डिसेंबर पासून शासकिय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
मागील बातमी वाचण्यासाठी क्लिक करा }}}} पुणे कोथरूड येथील नळस्टॉप येथे वाहतूक पोलिसांचा चिरीमिरीचा धक्कादायक प्रकार, एका जागरूक मुलीने केला पोलिसांचा भांडाफोड.
तसेच निलंबन काळात महिन्याचा निर्वाह भत्ता घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्वाह भत्ता दिला जाईल. तसेच निलंबन काळात कोणतीही नोकरी किंवा धंदा केल्यास निर्वाह भत्ता रद्द केला जाईल असेही आदेशात नमूद केले आहे. पुणे सिटी टाईम्स अशी रोखठोक भुमिका मांडत असल्याने काही पुणेकरांनी पुणे सिटी टाईम्सच्या कार्यालयात संपर्क साधून आभार व्यक्त केले आहे.