सिंहगड रोडवर पुणे मनापा अतिक्रमण निरिक्षकाला महिलेकडून शिवीगाळ, पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

सिंहगड रोडवर पुणे मनापा अतिक्रमण निरिक्षकाला महिलेकडून शिवीगाळ झाल्याची घटना घडली आहे. एका महिले विरोधात पर्वती पोलिस ठाण्यात ३५५ /२०२३,भादविक ३५३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एक मनपा अधिकारी, वय-३६ वर्षे, सहा. अतिक्रमण निरीक्षक, सिंहगड रोड, क्षेत्रिय कार्यालय, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

काल २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पु.ल.देशपांडे उद्याना जवळ, सिंहगड रोड,येथे यातील फिर्यादी हे पुणे महानगरपालिका अतिक्रमन/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग येथे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक म्हणुन काम पाहतात.

पुढील बातमी }}}} Pune robbery | पुण्यात कोयता गॅंगची दहशत, दुकानावर घातला दरोडा | व्हिडिओ व्हायरल |

फिर्यादी हे त्यांचे सोबत पुणे महानगर पालिका, अतिक्रमन विभागातील स्टाफ यांचेसह पु.ल.देशपांडे उद्याना जवळ, सिंहगड रोड, पुणे येथील अटी व शर्तीचे भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे दिलेल्या सुचने प्रमाणे अंमलबजावणी करण्याकरीता गेले असताना,

यातील नमुद महिला हिने फिर्यादी हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, त्यांना अपशब्द वापरुन,त्यांना शासकीय काम करण्यापासुन प्रतिबंधीत केले व त्यांना बघुन घेण्याची धमकी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here