जुन्या हद्दीत कारवाई, तर नवीन हद्दीतील रूफटॉप हॉटेलांवर कारवाईचे काय?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुण्यातील कोंढव्यात अनधिकृतपणे टेरेसवर ( रूफटॉप) हॉटेल थाटून व्यवसाय केला जात असल्याची बातमी काल दि. ३ नोव्हेंबर रोजी “पुणे सिटी टाईम्सने” बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन पुणे महानगर पालिकेने कारवाईचा बडगा उगारुन कारवाई करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ५ यांच्या वतीने कोंढवा, कौसरबाग येथील हॉटेल्सवर तसेच बिबवेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कोंढवा खुर्द एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा स्टेट येथील मुघल सराई रेस्टॉरंट हे १२६०० स्क्वेअर फुट मध्ये चालू होते. १२६०० स्क्वेअर फुट वर कारवाई केली आहे.
तर सिल्वर स्पून हॉटेल हे ११४०० स्क्वेअर फुट मध्ये चालू होते. ११४०० बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. परंतु फक्त जुन्या हद्दीत कारवाई करण्यात आली असून नव्या कोंढवा हद्दीत १५ पेक्षा जास्त रूफटॉप हॉटेल असताना कारवाई करण्यात आलेली नाही. बाकीच्या रूफटॉपवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सदरील कारवाई अधिक्षक अभियंता सुधीर कदम आणि युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता रमेश काकडे चंद्रसेन नागटिळक, शाखा अभियंता श्रमीक शेवते आणि उमेश शिद्रूक, कनिष्ठ अभियंता विशाल पाटील उपस्थित होते.