पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुण्यातील कोथरूड येथील स्पाइस गार्डन,कोरिएंटल लिफ व डेलिहा या अनधिकृत हॉटेलवर पुणे महानगर पालिकेने हातोडा चालविला आहे. कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आज १७ मे २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ६ ने कोथरूड परिसरातील अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई केली आहे.
या कारवाईत कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, उप अभियंता श्रीकांत गायकवाड, शाखा अभियंता मुकेश पवार, कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते, सागर शिंदे, गणेश ठोबरे , राठोड, ऋषिकेश जगदाळे ,भावेश इत्यादी स्टाफने अतिक्रमण
कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोथरूड मधील स्पाइस गार्डन ,कोरिएंटल लिफ व डेलिहा या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. सदर कारवाई दरम्यान जवळपास २५ हजार स्क्वेअर फिट अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले आहे.