३० लाखांपेक्षा जास्त रक्कम प्रॉपर्टी टॅक्स थकल्याने पुण्यातील दोन हॉटेलांना पुणे महानगर पालिकेने ठोकले सील; प्रॉपर्टी थकबाकीदारांमध्ये उडाली खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

मंगळवार २० जून रोजी धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे, या ठिकाणी २५ मिळकतींना कर आकारणी व कर संकलन उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडून प्रत्यक्ष भेट देण्यात आली. सदर तपासणी दरम्यान अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती रूप टॉप, साईट मार्जिन, फ्रंट मार्जिन, असलेल्या मिळकती शोधण्या आल्या, तसेच थकबाकी असल्यास धनादेश प्राप्त करण्यात आले.

तसेच आकारणी न झालेल्या मिळकतींची तपासणी करण्यात आली. हॉटेल साईड मार्जिन, टेरेस चा वापर व अनधिकृत गोडाऊन औद्योगिक मिळकतींच्या आकारणीची तपासणी करण्यात आली.

त्या तपासणी वेळी नऱ्हे येथील १) त्रिमूर्ती इंजिनिअरिंग चे एकुण २० हजार स्पेअर फुटाचे आकारणी न झालेले गोडाऊन ची आकारणी करण्यात आली. २) हॉटेल वेदांत (आंबेगाव) येथे फ्रंट मार्जिन व रूफ टॉप तपासणी दरम्यान अनधिकृत वापर सुरू असल्याने त्याची आकारणी तीन पटींनी करण्याचे आदेश देण्यात आले. ३) हॉटेल विठ्ठल प्युअर व्हेज (आंबेगाव बुद्रुक) याची ३० लाख रुपयांची थकबाकी असल्यामुळे सील करण्यात आले.४) हॉटेल के.डी.सी फुड वर्ल्ड (धायरी) याची ३१ लाख ३९ हजार इतकी थकबाकी असल्यामुळे मिळकत, हॉटेल सील करण्यात आले.५) हॉटेल निखारा (धायरी) मिळकत सिलिंगची कारवाई करतेवेळी दोन लाखांचा चेक दिला आहे. ६) ओके पॅकिंग गोडाऊन (धायरी) अंदाजे १४००० स्क्वेअर फुट अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन बांधकामाची परवानगी न घेता सुरू ठेवल्याने तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले.

या पुढेही संपूर्ण शहरात अशाच प्रकारे प्रत्यक्ष भेटी देऊन , मिळकतींच्या आकारणीची तपासणी करून वाढीव बांधकाम अनधिकृत वापर व आकारणी न झालेल्या मिळकतींची आकरणी करणे , थकबाकी वसुली व सीलींग करणेची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.अशी माहिती अजित देशमुख उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here