पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणे पुण्यातील पोलिसाला चांगलेच अलंगट आले आहे.गुन्हा दाखल होताच त्या पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सदरील प्रकार हा इतर कुठेही झाला नसून पुण्या सारख्या शिक्षित शहरात झाला आहे.
समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गणेश शिवाजी चेमटे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ ,१ संदीप सिंह गिल्ल यांनी शुक्रवारी आदेश काढले आहेत.
पोलीस कर्मचारी गणेश शिवाजी चेमटे यांचा दोन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून “लगीच ती गरोदर राहुन तिने एका बाळाला जन्म दिला.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात यांच्यासह इतरांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत व पोक्सो कायद्यानुसार गुरुवारी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याने गणेश चेमटे यांना निलंबित करण्यात आले आहे.