पब संस्कृतीला पुणे पोलिसांचा पाठिंबा? पब धारकांची माहिती खुली करण्यास मनाई, माहिती अधिकाराला वाटाण्याच्या अक्षता.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुण्या सारख्या शहराच्या नावाला काळ फासण्याचा काम होत असताना पुणे पोलिस पब संस्कृतीला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. कल्याणी नगर मध्ये पोर्शे कारने दोन जणांचा जीव घेतल्यानंतर पुणेकरांमध्ये व अख्या महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. त्यात पोलिस, आमदार, न्यायालयाला देखील सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे.

तर एकीकडे पब संस्कृतीला बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यात आता पुणे पोलिसांनी माहिती अधिकारात दिशाभूल करणारी माहिती दिल्याने, पुणे पोलिसांचा पब संस्कृतीला पाठिंबा आहे का? असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजहर खान यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात माहिती अधिकारात , पब, परमिट रूम, बियरबार बाबतीत माहिती मागितली होती. ती माहिती देणे बंधनकारक असताना, माहिती देण्यास नकार दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, आपण मागणी केलेल्या माहिती मधून कोणतेही व्यापक जनहित साध्य होत असल्याचे दिसून येत नाही तसेच सदर माहिती त्रस्त पक्षाची संबंधित असून सदर माहिती पुरविण्यास माहिती अधिकार अधिनियम ८( त्र) व कलम ११ अन्वये बाधा येत असल्याने सदर माहिती पुरविणे कायदेशीर दृष्ट्या योग्य होत नाही त्यामुळे सदरची माहिती पुरवता येऊ शकत नाही. असे पत्र जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त, प्रशासन पुणे शहर अजय चांदखेडे यांनी काढले आहे.

अजहर खान म्हणाले सदरील माहिती ही लोकहितार्थ असल्याने देणे बंधनकारक असताना ती जाणून बुजून आणि पब धारकांच्या हितार्थ पोलिसांनी नाकारली आहे. विशेष म्हणजे सदरील माहिती ही माहिती अधिकार कलम ४ (१) ख नुसार त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.परंतू पोलिसांनी माहिती अधिकार कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

मागितलेली माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे, हे विभाग देऊ शकते तर पोलिस खातं का नाकारतयं? या संदर्भात खान हे राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल कर असल्याचे सांगितले आहे. पुणे शहर पोलिसांबद्दल नेटकऱ्यांनी रान पेटवले असताना असे उत्तर देऊन कोणाचे हित जपले जात आहे. यातून सुस्पष्ट दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here