दरमहा मिळणारी मलाई महिन्यावर गेल्याने अधिकाऱ्यांच्या तोंडाची मलाई खाल्ली एंजटाने?
त्या एंजटाचा आणि जी फार्म चा लवकरच पोलखोल?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे आरटीओतील अनागोंदी कारभारा बद्दल आपण ऐकतच असतो आणि विषेश म्हणजे जी फार्म बद्दल, जी फार्म मागून टेबला खाली जमा होणारी रक्कम ही चिल्लर जमा होत नसून रोज जी फार्म मध्ये जमा होणारी मलाई ही लाखोंच्या घरात आहे. म्हणूनच अधिकारी,कर्मचारी गलेलठ्ठ झाले आहे. फुलेनगर आरटीओतील एंजटाकडून जी फार्म च्या नावाने रोजची मलाई जमा होत असे, परंतु रोजची किटकीट नको म्हणून एका इमानदार एंजटाच्या मुलाकडे ( झिरो कर्मचारी) जी फार्मची जबाबदारी देण्यात आली. परंतु बापा सारखा मुलगा इमानदार असणार असं नाही ना?
जानेवारीमध्ये सुमारे ३० लाखांचे कलेक्शन केले अन् तो एंजट कबुतर सारखा फुर फुर फुर्र.?झाला. त्यामुळे आरटीओतील अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि त्याचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू झाली. ‘झिरो’चा व्यवहार रेकॉर्डवर नसल्यामुळे ना पोलिसात तक्रार देण्यात आली, ना कुठे वाच्यता करण्यात आली. मात्र या प्रकारामुळे आरटीओ अधिकारी आणि निरीक्षक हवालदिल झाले आहेत.
आरटीओ कार्यालयात अधिकारी व निरीक्षक आपल्या कमाई’चे उत्तराधिकारी झिरो कर्मचाऱ्यांवर सोपवून आपल्या कार्यात मग्न राहतात. काही अधिकारी दिवसाचे कलेक्शन त्याच रात्री घेतात, तर काही महिना अखेरीस घेतात. महिन्याच्या कमाईतून सुमारे दहा टक्के कमिशन झिरो कर्मचाऱ्याला दिले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.
पुण्यात आरटीओ कार्यालयात झिरो कर्मचाऱ्यांचा मुक्त वावर आहे. साहेबांकडून काम करून घेण्यासाठी एजंट व नागरिक यांच्यातील झिरो कर्मचारी महत्त्वाचा दुवा ठरतो. आळंदी रस्त्यावरील फुलेनगर आरटीओ कार्यालयात वाहनांचे पासिंग व परवाना देण्याचे काम केले जाते. एका वाहनाच्या पासिंगसाठी एंजट ( झिरो) ‘ नागरिक किंवा एजंटकडून नवीन रिक्षा ४००,जुनी रिक्षा पासिंग २५०,कार ४०० ते ५००, मोठया वाहनांचे १००० रुपये जी फार्म च्या नावाखाली जमा केले जातात अशी माहिती आतील सोर्स कडून मिळाली आहे. याची पुष्टी केली असता याला अधिकृत सुत्रांनी दुजोरा दिला आहे.
एवढ्या मोठ्या प्रकाराची तक्रार तर सोडाच चर्चा देखील दाबून दाबून केली जात आहे. या सर्व प्रकारची दखल परिवहन आयुक्त व परिवहन मंत्री घेणार का? असा प्रश्न आज प्रमाणिक पणे जी फार्म भरणारे नागरिक विचारत आहे?तर दिवसारात किती दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, मोठ्या वाहने ( विविध प्रकारचे) पासिंग होत असतात याचा हिशोब आणि जी फार्मचा गौडबंगाल पुणे सिटी टाईम्स लवकरच उघडकीस आणणार आहे. क्रमशः