६ लाख २६ हजार दंड कमी करून फक्त २ हजार रुपये दंड मारायचे असेल रेशनिंग दुकाने तपासणी करायची का नाही?
एका तत्कालीन अधिका-यांनी मदत केल्याची चर्चा.
दंड लवकरात लवकर वसूल न करता का केला गेला अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे भवानी पेठेतील काशेवाडी मधील भिकाजी सुबराव माने यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास सहकारी ग्राहक संस्था ब”३५ व ब”७७ स्वस्त धान्याच्या दुकानात तपासणीच्या वेळी बरीच विसंगती व धान्यात तफावत आढळून आल्याने आणि दुकानांचा धान्याचा माल “अनिल डांगी” या इसमाच्या मालकीच्या दुकानांमध्ये विनापरवाना धान्य उतरित असल्याचे दिसून आले होते.
तर “अलि शेख” नावाच्या इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये धान्य वाटप व धान्याचा साठा होत असल्याचे आढळून आले होते. संबंधित दुकान रद्द करुन ६ लाख २६ हजार ६८० रूपये दंड ठोठावला होते. परंतु तत्कालीन राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ६ लाख २६ हजार रुपये दंड कमी करून २ हजार रुपये दंड व ३ हजार रुपये अनामत रक्कम असे ५ हजार रुपये दंड केल्याने रेशनिंग कार्यालयात चर्चेला उधाण आले आहे.
६ लाखांचे दंड ५ हजारांवर आणून असे आदेश होत असतील तर स्वस्त धान्य दुकाने तपासणी करायची का नाही? असा प्रश्न अधिकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे सिटी टाईम्सच्या हाती आलेल्या माहितीनुसार एका तत्कालीन अधिका-यांनी संबंधित दुकानदाराला मार्गदर्शन केल्याचे देखील बोललं जात आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने सांगितले की आम्ही ईमाने इतबाराने काम करून शासनाचा महसूल वाढावं आणि चोरांवर वचक राहवी यासाठी प्रयत्न करत असलो तरी असे दंड मंत्रालयातून कमी होत असेल तर दुकानदारांमधून कायद्याची भिती संपेल यात शंकाच नाही. आणि चोरावर मोर नको व्हायलात,असेही सांगितले आहे.
” राजकीय पक्षाच्या नेत्यानी कार्यकर्त्याची केली मदत? “
संबंधित दुकानादार एका माजी नेत्याच्या संपर्कात असल्याने मुंबईवारी घडवून आणली व तेथे आर्थिक हितसंबंध आल्याचीही चर्चा रेशनिंग कार्यालयातून ऐकायला मिळत आहे.
” सोशल मिडियावर नेटिझन्सनी चांगलीच घेतली खरडपट्टी “
पुणे सिटी टाईम्सने सर्व हकीकत प्रसिद्ध केल्यानंतर सोशल मिडियातील नेटिझन्सनी त्या आदेशावर चांगलीच खरडपट्टी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यापेक्षा नागरिकांचे तोंडाचे घास व हक्काचे धान्य चोरणाऱ्या चोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी सोशल मिडियावर होत आहे. क्रमशः