भवानी पेठेतील भंगार विक्रेता झाला रेशनिंग माफिया?
गुन्हा दाखल असतानाही नागरिकांकडून खरेदी करतोय रेशनिंगचे धान्य.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरातील काही झोपडपट्टी भागात राजरोसपणे रेशनिंगचया धान्याचा काळाबाजार सुरू असताना वरिष्ठांकडून सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. तर पुण्यातीलच रेशनिंग दुकानदारच नागरिकांना विकलेले धान्य पुन्हा तेच खरेदी करत असल्याचे प्रकार सध्या दिसून येत आहे.
कोरोना काळात नागरिकांनी उपाशीपोटी राहू नये यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना( PMGKAY) योजना आणुन प्रति युनिट मोफत ५ किलो तांदूळ देऊन योजना सुरू केली. त्या धान्याचा कोरोना काळात गोरगरिबांना भरपूर प्रमाणात फायदा झाला. परंतु आताही ते धान्य मिळत असल्याने नागरिकांनी ( रेशनिंग कार्ड धारकांनी) ते शासकीय धान्य विकण्याचे सुरू केले आहे.
ते धान्य दुसरे तीसरे कोणी खरेदी करत नाही तर थेट रेशनिंग दुकानदारच शासकीय धान्य खरेदी करून रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनातून व रिक्षातून शासकीय धान्य मिलला पाठवत असल्याचे दिसून आले आहे.
आणि विषेश म्हणजे यात भवानी पेठेतील एक भंगार विक्रेता देखील रेशनिंग धान्य खरेदीदार बनला असून तो आता स्वतःला रेशनिंग माफिया म्हणून स्वतःला संबोधत आहे.
काळेवाडी भवानी पेठेतील माजी नगरसेविका अर्चना पाटील यांच्या कार्यालयाजवळ असलेला भंगार विक्रेता “जावेद ” याच्या विरोधात ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांनी कारवाई करून गुन्हा देखील दाखल केला होता. परंतु आता काही अधिका-यांना, पोलिसांना हताशी धरून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदीदार बनला असून त्याच्यावर कारवाई करण्यास पुरवठा विभागाची यंत्रणा कुचराई करत आहे? क्रमशः