पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचा रुद्रावतार; सहकारनगर पोलिस ठाण्यानंतर आता वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतर पोलिस निलंबित

0
Spread the love

सहकारनगर, वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निलंबित झाले परंतु खडक वाहतूक शाखेतील लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची निलंबनाची कारवाई कधी होणार?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाईचा धडका लावला असून पहिल्यांदा पेरूगेट पोलिस चौकीतील ३ व सहकारनगर पोलिस ठाण्यातील ७ असे पोलिसांचे निलंबन काही तासच झाले असताना पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुन्हा एकदा दणका देत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतरांना निलंबित केल्याने पोलिस दलात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील तत्कलीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांना निलंबीत केले आहे.१) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, २) पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, ३) पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, ४) पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळ, ५) पोलिस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, ६) पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे, ७) पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हाके आणे पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) दत्ताराम बागवे हे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते तर इतर बाकीचे सर्वजण वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.त्यांना वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात कर्तव्य बजाविताना हालगर्जीपणा केल्यामुळे आणि जबाबदारी पार न पाडल्यामुळे निलंबीत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here