रिक्षा चालकाला १ लाख २० रूपये व्याजाच्या पैशासाठी धमकवणा-या सावकारास सहकारनगर पोलिसांकडून अटक

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

व्याजाचे पैसे देऊनही अधिक पैश्यांची मागणी करून धमकी देणा-या सावकाराला खंडणी विरोधी पथक-१, ने अटक केली आहे.बिलाल इसाक शेख रा.डॉल्फीन चौक, बिबवेवाडी याला अटक केली आहे.अवाजवी व्याजाच्या पैशाची मागणी करून अर्जदार यांचे घरी माणसे पाठवुन अर्जदाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.

तक्रारी अर्जाची चौकशी करता अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी वेळोवेळी २९ हजार ५०० रूपये १५ % व्याज दराने दिले होते.अर्जदारांनी त्याबदल्यात शेख याला ५३ हजार ९९० रूपये दिले असताना देखील शेख हा दंड व व्याजापोटी आणखी १ लाख २० हजार रूपयांची मागणी करीत होता.

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणुन अर्जदार यांचे घरी माणसे पाठवुन अर्जदार यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणा-या सावकाराविरुध्द खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

खंडणी विरोधी पथक -१ चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, अभिजीत पाटील,विकास जाधव, यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार, प्रमोद सोनवणे, रविंद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव,किरण ठवरे, अमर पवार व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here